
मी भिजतच होते..अजुनही
आजही मला पहिल्या पावसात आमच जुन घर आठवत.. बैठ-कौलारु, मोठ अन्गन अन् खुप सारी झाड..मी आणि माझी मैत्रिण पहिल्या पावसात खूप भिजायचो.. आता ते घर जाउन तिथे मोठा टोwएर झाला आणि आम्हीही वेळेने बान्धल्या गेलो..पण पाउस तोच आहे आणि आठवणी अजुनही तितक्याच ताज्या..
आज पुन्हा पाउस आला - तुझी आठवण सोबत घेउन्
मी खिडकीतून बघत होते
आपण पावसात भिजत होतो..
गारा-गारा भिन्गोर्या म्हणून गिरक्या घेत होतो
छान मातीचा वास सुटलेला
पक्शान्चा किलबिलाट उठलेला
मी खिडकीतून बघत होते
आपण खेलण्यात गर्क होतो..
सरी अऩ्गावर झेलत आनन्दाने बागडत होतो
आपण पाण्यात होड्या पण सोडल्या
तेवढ्यात वीज कडाडली - ढग गडगडले
आपण घटट् मिठी मारली
मी खिडाकीतच उभी होते - एकटी तुला शोधत
बाहेर पाउस थाम्बला होता
अन्. मी भिजतच होते.. अजुनही..
2 Comments:
Pavsa varchi kavita phar aavadli...
Keep up the good work!
TUMCHI KAVITA FAR FAAAR SUNDAR AAHE.
AAPLYALA AAWADALI,
MARATHISCRAP@GMAIL.COM
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home