Friday, February 02, 2007

माझी किचनवारी......

राधिका आणि स्वयंपाक.. काही महीन्यांपुर्वीपर्यंत आमच्या घरातल्या सगळ्यांचा हाच सूर असायचा..त्याला तसं कारणही असायच..किचनमध्ये तशी आमची व्हिजिट फ़ारच अपवादाने..तीही खाऊचे डबे शोधन्यालाच.. आणि कुणी छेडलच तर उत्तर तयार..माझे आई-बाबा दोघही सुगरण आहेत माझ्यावर वेळच येत नही..

आणि तसे स्वत: प्रयोग केले नसले तरी खवैयेगिरिमुळे थेरॉटिकल नॉलेज अगदी अपटुडेट.. अगदी मांड्यांपासुन ते कोफ़्ता करी पर्यंत सगळ्याच्या रेसीपीज अगदी तयार...मागच्या सुट्टीत आजोळी गेले आणि मामाने बरोबर शब्दात पकडल..करुन दाखवेन नाही.. करुन दाखवचं.. आणि एकदम डिक्लेअर- आजचा स्वयंपाक ताई करणार अगदी सकाळच्या नाश्त्यापासुन ते सांध्याकाळच्या खाऊ पर्यंत तेही कुणाला न-विचारता..मामा नेहमीसारखीच मजा करत आहे असच सगळ्यांचा समज.. पण मी चॅलेंज घेतल.. आणि सुरुवात झाली ती कांदा-पोह्यांपासुन..

घरात.. हॉस्टेल मधे ३-४ जणासठी करण वेगळ.. आणि एकदम १०-१२ जणांसाठी..त्यात काय इतंकस म्हणत सुरुवात तर केली..दोघी मामी मस्त बसुन मजा बघत होत्या..पण चैत्राला, माझी सगळ्यात लहान बहीण, काहि राहवेना..ताई मी शिकवु का तुला.. अस म्हणत बाई आल्या.. आणि तिच्या एक-एक इंस्ट्रक्टशन्स सुरु झाल्या..तिला ओरडुन पिटाळते आहे.. तेवढ्यात दुसरा मामा आला.. ताई चल सोड मी करतो.. आपण मामाला सांगु तु केलेस म्हणुन.. एक एक करुन सगळेच फ़िरकी घेऊन जात होते.. शेवटी अर्ध्यातासांच्या अथक परिश्रमांनंतर पोहे झाले..'अजुन सुधारणेला वाव आहे..' असा अभिप्राय घेऊन मग आमची स्वारी वळली ती दुपारच्या जेवणाकडे.. तसही पोळ्यांना बाई आहे त्यामुळे तो प्रश्न सुटला होता..(नाही तर किती देशांचे नकाशे तयार झाले असते कोणास ठाऊक)

मग सोपा म्हणुन चित्रान्ना आणि दम-आलु करायच ठरवल..तरी इतक्याजणांसाठी प्रमाणाचा अंदाज येईना..तेवढ्यात आजीने पूर्वी कुणालातरी सांगितलेल आठवल..जेवढी माणस तेवढी मुठी भात घ्यायचा.. आणि बटाटे पण माणशी एक.. हे आठवल्यावर सगळच एकदम सोप झाल..मग चैत्रा.. आणि विश्वेश पण आले मदतिला ताई आम्ही भाजी चिरुन देतो करत.. आणि चक्क २ तासात अगदी चटणी, कोशिंबिरीसकट सगळा स्वयंपाक रेडी..
मग ट्राय करायला काय हरकत म्हणुन शेवयाची खिर पण केली..

चैत्राने आणि मी मस्त पंगत मांडली.. एरवी अगदी ताटावर येऊन बसणारे आम्ही आज सगळ्यांना वाढायला थांबलो होतो.. आजोबा तर फ़ारच खुश होते..त्यांच्या लाडक्या ताईने आज सगळा स्वयंपाक केलेला..सगळ छानच झालय.. बघुनच कळत आहे की.. आजोबा म्हणाले.. तोवर मामाने खिरीचा पहीला घास तोंडात घातला.. आणि एकदम तोंड वाकड करत म्हणाला.. अग ताई हे काय.. साखरे ऐवजी मिठ घातलस खिरीत...किती वेंधळी तू.. माझा चेहरा खरकन उतरला.. चल काहीतरीच काय...ती थट्ट करतो आहेस.. मामी तू बघ ना ग..मामीने पण चव घेतली.. राधु खरच की ग..पिठीसाखर वाटली होय तुला..मी आजीकडे बघतेय तिही तेच सांगतेय...मला आता अगदी रड उ यायला लागल..मला खरच कळलच नाही.. पण अग खरच मला पिठी साखर वाटली..पण दूध फ़ुटल कस नाही...खरच ना तुम्ही खर सांग्ताय..तुच चव बघ..म्हणत मामाने एक घास भरवला.. मी तोंड कसच करत चव घेतली..तर खिर खूपच छान झालेली अगदी आई करते तशी आणि सगळे एकदम हसायला लगले.. अरे ताई आम्हाला वाटलच नाही तुला इतक सगळ करता येईल.. गुड..पहीला प्रयोग यशस्वी झाला...

1 Comments:

Blogger Mega Jobs India said...

Hey wonderful blog truly heart touching.
My name is Shrikant Bhalerao
I am pursuing BCS from pune university.
me looking for people in our community...........and by the way wats this oman consultants thing is.........

5:08 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home