Monday, February 19, 2007


मी ...

मी कधी निर्झर झुळुझुळु वाहणारा
मी कधी एक लाट किनार्याकडे ओढावणारी
मी कधी सन्थ स्तब्ध नदी
माझ्याच काठावर बसून
माझ्यातच उठणारी वलये
रोज नव्याने बघणारी...

मी कधी झुळुक मन्द वार्याची..
मी कधी लडीवाळ सर पावसाची..
माझ्याही अन्तरी
कधी उठतो सूसाट वारा
मीच असते वार्यावर मिणमिणारी
एकच ज्योत पणतीची

मी कधी रम्य पहाट सुखान्ची
मी कधी कोवळी किरणे उन्हाची
कातरवेळही मीच
अनमिक हुरहुरिची
आणि मन्तरलेली रात्रही मीच
अन्धाराच्या साम्राज्याची..

मी कधी गुलाब मुग्ध फ़ुललेला
मी कधी रातराणीचा सुगन्ध हवेवर दरवळलेला
मी कधी बन्द कळी
उमलण्या आसुसलेली
मीच कळी सहजच कोणी
फ़ुलण्याआधी खुड्लेली

मी कधी अवखळ हास्य ओठान्वरचे
मी कधी खट्याळ ख़ळी गालान्वरची
मी सहजच मिटलेल्या पापण्या
हुन्दका लपवताना
अन मीच एक चुकार अश्रु
गालावर नकळत ओघळलेला

मी कधी मित्रान्ची मैफ़िल रन्गलेली
मी कधी हळवी नाती जीवापाड जपलेली
तरिही मी अलिप्त
माझ्याच विश्वात रमणारी
येणार्या माझ्या क्षणात
मनीचे रन्ग भरणारी...

1 Comments:

Blogger माझी माय मराठी said...

atishay sundar



मी कधी गुलाब मुग्ध फ़ुललेला
मी कधी रातराणीचा सुगन्ध हवेवर दरवळलेला

1:42 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home