Wednesday, February 28, 2007



अरेंज मॅरेज

कॉलेज सरल.. कॅम्पस थ्रुच जॉब लागला..
पहिल्या पगाराचा चेक़सुद्धा हातात आला..
पहिल्या पगाराची म्हणुन आजीला साडी घेतली..
पण आता तुझ्या लग्नातच घडी मोडेन बरं
म्हणत आजीने आमचीच विकेट घेतली…


मग एकदम सगळ्या घराला वेगळेच वेध लागले..
अगदी दुरदुरच्या लग्नानाही आई-बाबा आवर्जुन जाऊ लागले..
पत्रिका..गोत्र..मंगळ..गण नक्षत्र.. अचानक घरात अवतरले..
वधु-वर सुचक मंडळांमधे आमचेही फोटो झळकले..


तुमच्या ओळखीत असेल तर बघ बर..
आई सहजच मैत्रिणिंना सांगते..
किति ग तुझ्या ओळखि म्हणुन तोंडभर कौतुक करते
गावच्या चौकशा हीला अस हीच्याबद्दलच का ती म्हणते…


रविवारची सकाळ तर एक कार्यक्रमच असतो ..
पेपर .. पत्रे..कुठुन कुठुन स्थळे ‘शॉर्टलिस्ट’ करत
बाबांबरोबर आताशा दादाही बसतो..


आमच्यावेळी बर होतचा उद्धार तेव्हा सुरु होतो…
किती तुमच्या अपेक्षा म्हणता म्हणता
बाबांचा कधीकधी पारा ही चढतो..


इतक्यात कुठुनसा फोन येतो.. कूणा काका-मामांचा..
त्यांचाही भाचा नुकताच झालेला असतो लग्नाचा..
तेव्हा मात्र बाबा एकदम बदलतात…
माझ्या मुलीच कौतुक मीच काय करु करत..
मलाच अनोळखी असे माझे गुण बाबांच्या तोंडुन अवतरतात


मग तारिख ठरते त्यांच्या घरी भेटण्याची..
मनात चरफ़ड होते अजुन एका रविवारची झोप मोडल्याची..
पुढच्या रविवारी सकाळीच आमची वरात निघते..
‘तिथे कसं वाग’ ही आईच्या सुचनांची यादी अखंड सुरु असते


'शोधायला फ़ार वेळ नाही न लागला..'
'छे हो रविवार गाड्यांचा गोंधळ नेहमीचा..'
नेहमीची छापिल बोलणी..त्यावर नेहमीचच ठेवणितल हास्य..
मग सुरु होतो ओळख सोहळा.. एकडच्या तिकडच्या ओळखी निघतात..
मुद्दा सोडुन मंडळी सगळ्या गावभर भरकटतात..


तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर.. इति बाबा
उगाचाच सगळे हसतात..
आत मुलांनीच काय ते ठरवायच.. आम्हा म्हातार्याना काय..इति मुलाचे बाबा
पुन्हा सगळे हसतात..
मुलाना आत बसुन बोलू दे..
ह्यावर आम्ही 'आधुनिक'चि आरती दोन्हीकडचे पालक आळवतात
मग ग्रह..तारे अन जात-पोटजात ह्यावर हेच का आधी डोक खापवतात


तुझ्या अपेक्षा माझ्या अपेक्षा यांचि देवाणघेवाण होते..
तेव्हाच घरातली प्रत्येक व्यक्ति दर ५ मिनिटाला आत सहजच डोकवत असते..
एक तर दडपण तरी उत्सुकता..एकूण सगळाच गोंधळ असतो
अजुन कितीतरी बोलायच असताना वेळ मात्र उरलेला नसतो


तुमच मत जरुर कळवा म्हणत सामोपचारची बोलणी होतात..
खरंच का त्या १५ मिनिटात आयुष्याची नाती जोडता येतात?



-राधिका

4 Comments:

Blogger Saurabh said...

Hi Radhika,

A heartfelt pean which conveys your emotions towards the process of an "arranged marriage".

1:29 PM  
Blogger madhura said...

Radhika,

Great Kavita Yaar !!!

Every line is reflecting the truth of the arrange marriage process.

Nice One.....

1:45 AM  
Blogger माझी माय मराठी said...

jhakkkas radhika, tumchi real kavitaa malaa pharach aawadli buaa, tumchya kadun aankhi aapekshaa aahet malaa aawadel tumhi mail pathwale tar


marathiscrap@gmail.com


majhyakade sudhha sundar kavitaa aahet tumchyasathi

1:38 AM  
Blogger Sandeep Sardesai said...

Apratim.. Jhakaass... Lay Bhaari..

11:41 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home